Monday, February 22, 2010


आज ठरवलं ... खूप खूप लहान व्हायचं .....
चिमणीचे पंख घेउन आकाशात उडायचं .....
नंतर जाणवलं ... आता ते जमणार नाही...
तुला सोडून माझं मन आकाशात पण रमणार नाही....

इन्द्रधनुष्यातही गुलाबी रंग दिसायचा ...
फुलांची मुग्धता घेऊन तुझ्या सोबत हसायचा ...
पावसात न भिजताही एखादं चिंब स्वप्न पाहायचं ....
कधी त्या ढगासारखं नुसतच रडायचं.....

आता मात्र हे बघून मी परत कधीही रडणार नाही....
तुला सोडून माझं मन कुठेही रमणार नाही.....

आठवतयं ? आपण तासन-तास बोलायचो ...
गर्दीतही फक्त एक-मेकांशीच बोलायचो....
कधी न बोलता फक्त तुलाच ऐकायचंय.....
आणि नकळत , न सांगितलेल्या ,माझ्या मनातल्या गोष्टी तुला कसं काय उमजायचं ???

आता परत माझ्याशी अस कोणीही बोलणार नाही...
तुला सोडून माझं मन आता कुठेही रमणार नाही...

4 comments:

  1. तू मराठीही लिहितेस ?

    ReplyDelete
  2. well rakhee u already got my comment on tht poem.......bt still I can't stop myself to write something gud abt tht again........Even I dnt know marathi too much....I got the soul of the poem seriously..Thrs sme magic in ur words......awesomely crafted.....keep up the work dear......n u really shocked me by ur marathi :) Cheers!!!!!!!!

    ReplyDelete
  3. sundar kavita... sundar shabdanchi sundar mandani.....
    ani titakyach sundar kavitet dadalelya bhawana..

    ReplyDelete